ऐतिहासिक वास्तू या पुरातत्त्व संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्या काळाच्या साक्षीदार असलेल्या या वास्तू आपल्यासमोर तो ऐतिहासिक काळ उलगडून दाखवतात. महाराष्ट्राला गड-किल्ल्यांची अनमोल ठेवा आहे. एखाद्या गडावर गेल्यावर आजही मराठी मावळ्यांचा पराक्रम आठवून ऊर अभिमानाने भरून येतो. किल्ल्यांप्रमाणेच अजून एक महत्वाची वास्तू म्हणजे लेण्या.लेण्या त्या त्या काळातील सामाजिक,आर्थिक,राजकीय ,सांस्कृतिक स्थितीचे संदर्भ आपल्यापर्यत पोहचवतात. ‘लेणी’ …
Author Archives: swatibhat
ऐतिहासिक ‘महाराष्ट्र’
१ मे ,१९६० रोजी भाषेच्या आधारावर स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यासाठी झालेला लढा आपल्याला माहित आहेच. परंतु महाराष्ट्र राज्याचा इतिहास किती मागे जातो,याचा विचार करायचा म्हटले तर सर्वसाधारणपणे आपल्या समोर शिवाजी महाराज, पेशवे हे सगळं डोळ्यासमोर उभे राहाते. त्या आधी इथे होऊन गेलेल्या साम्राज्यांची तितकीशी ओळख नसते. तेच मांडण्याचा हा एक प्रयत्न…‘महाराष्ट्र’ या नावाने …
भारतातील पुरातत्त्व संशोधनाचा प्रवास..
पुरातत्त्व म्हणजे नक्की काय व त्याचा अभ्यास कसा असतो हे आपण गेल्या भागात वाचले. पण हे पुरातत्त्व संशोधन सुरू कधी झाले? विशेषतः भारतात त्याचा उगम कसा झाला हे वाचूया या भागात. पुरातत्त्व संशोधन भारतात कधीपासून सुरू झाले याचा विचार करत असताना आपल्याला मुख्यतः तीन कालखंड लक्षात घ्यावे लागतात.एक ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी,दुसरा ब्रिटीश साम्राज्य असताना आणि …
पुरातत्त्व म्हणजे काय??
आठवणींमध्ये रमायला कोणाला आवडत नाही ? किंवा आपल्या आधी घडलेल्या घटना ऐकताना आपण रमतोच! थोडक्यात काय तर आपल्या पूर्वीचा इतिहास हा नेहमीच माणसाच्या कुतूहलाचा भाग राहिला आहे.नदीचे मूळ आणि ऋषींचे कूळ शोधू नये असे म्हंटले जाते.परंतु हे शोधायचा प्रयत्नच नाही केला तर माणसाला सिंधू नदीच्या काठी वसलेल्या संस्कृतीचा शोध कसा लागला असता? सिंधू संस्कृतीतल्या माणसांविषयी …